Competitions

सुरसंगत बंदिश गायन स्पर्धा २०२०

सूरसंगत संस्था ही कै. रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व हयांचे जावई डॉ. वसंतराव उर्फ नानासाहेब देशपांडे ज्यांनी १९५३ साली 'सवाई गंधर्व पुण्यतिथी' सुरू केली व सातत्याने २५ वर्षे साजरी करून तिला दर्जा प्राप्त करून दिला, त्यांच्या स्मरणार्थ स्थापन केली. सूरसंगत संस्था स्थापनेचा हेतू नवोदित गायक व वादकांना प्रोत्साहन देऊन त्यांना स्वरमंच उपलब्ध करून देणे हाच होता. नवोदितांबरोबर प्रथितयश कलाकाराला पाचारण व्हायचे.

संस्थेने आतापर्यंत जवळजवळ ८० कलाकारांचे अभिजात शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले आहेत. संस्थेने या वर्षी डॉ. नानासाहेब यांच्या पत्नी कै. प्रमिलाबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवोदित गायक कलाकारांसाठी स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले आहे.

संस्थेच्या कार्यवाह सूरमणी सौ. पदमा प्रभाकर देशपांडे ह्या कै प्रमिलाबाईंचा स्नुषा म्हणजेच कै. सवाई गंधर्व ह्यांच्या नातस्नुषा म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांच्या स्वरपद्म भाग १ आणि स्वरपद्म भाग २ अशा २ (दोन) सिडीज सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात २०१२ आणि २०१३ साली प्रकाशित करण्यात आल्या. ह्या सिडीमध्ये त्यांनी बांधलेल्या आणि गायलेल्या ७५ बंदिशी आहेत. त्यामधील १५ बंदिशी त्यांच्या शब्दांसहित सूरसंगत संस्थेच्या SWARPADMA2020 या YouTube Channel वर उपलब्ध आहेत.

स्पर्धेच्या अटी व नियम पुढील प्रमाणे

  • स्पर्धकाने १५ बंदिशींपैकी कोणतीही १ बंदीश तबल्याच्या साथीसह गाणे. त्यामध्ये आलाप ताना बोलताना व सरगम असावेत.
  • गायन वेळ ३ ते ५ मिनिटे असावी.
  • रेकॉर्डिंग हे विडिओ रेकॉर्डिंग असावे.
  • सुरवातीला स्पर्धकाने स्वतः चे पूर्ण नाव, गाव व वय सांगावे.

पहिला गट वय वर्ष १० ते १५ आणि दुसरा गट वय वर्ष १६ ते २० असा आहे.
प्रत्येक गटासाठी ५ बक्षिसे ठेवण्यात आली असून

  • पहिले बक्षीस रू. ३०००/-
  • दुसरे बक्षीस रु. २०००/-
  • तिसरे बक्षीस रू. १०००/-
  • उत्तेजनार्थ २ बक्षिसे रु. ५००/-

स्पर्धकाने त्याचा गाण्याच्या विडिओ रेकॉर्डिंगची YouTube link संस्थेच्या sursangat95@gmail.com ह्या Email address वर पाठवावी. पाठविण्याची मुदत दि - २ सप्टेंबर २०२० पर्यत आहे.

स्पर्धेचे परिक्षक हे प्रथितयश कलाकार आहेत. स्पर्धेचा निकाल दि. ११ सप्टेंबर २०२० रोजी सायं ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. स्पर्धेची नोंदणी विनामूल्य आहे.

सूरसंगत आयोजित बंदिश गायन स्पर्धा निकाल

छोटा गट (वय वर्ष १० ते १५)

रमा जोगदंड,
पुणे

प्रथम क्रमांक

तन्वी इनामदार,
बेळगाव

व्दितीय क्रमांक

आदित्य पंडीत,
रत्नागिरी

व्दितीय क्रमांक

अमेय परांजपे,
पुणे

तृतीय क्रमांक

ऐश्वर्या देशपांडे,
पुणे

तृतीय क्रमांक

अमेय कुलकर्णी,
पुणे

उत्तेजनार्थ

साथ गवाणकर,
रत्नागिरी

उत्तेजनार्थ

मोठा गट (वय वर्ष १६ ते २०)

मैथिली बापट,
ठाणे

प्रथम क्रमांक

देवी लव्हेकर,
रत्नागिरी

प्रथम क्रमांक

ऋतुराज कोलपे,
पुणे

व्दितीय क्रमांक

रागिणी बाणे,
रत्नागिरी

व्दितीय क्रमांक

लिना खामकर,
रत्नागिरी

तृतीय क्रमांक

निधी केळकर,
बेळगाव

तृतीय क्रमांक

उर्वी प्रभुदेसाई,
पुणे

उत्तेजनार्थ

प्रद्युम्न नाडगौडा,
पुणे

उत्तेजनार्थ

वैष्णवी जोशी,
रत्नागिरी

उत्तेजनार्थ